Ad will apear here
Next
मुंबई मराठी पत्रकार संघात १६ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी अंकांचे भव्य प्रदर्शन
मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाने दर वर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी अंकांचे भव्य प्रदर्शन ११ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत आयोजित केले आहे.

ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदान परिसरातील पत्रकार भवनात प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. यात विविध विषयांना वाहिलेले वाचनीय दिवाळी अंक वाचकांना पाहावयास मिळतील.
गत वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील मुंबई मराठी पत्रकार संघ आपल्या सदस्यांना ५० टक्के सवलतीच्या दरात दिवाळी अंक उपलब्ध करून देणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, साहित्यप्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे. सकाळी ११.०० ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन विनामूल्य पाहता येईल.

महाराष्ट्रात दिवाळी अंकांची गौरवशाली परंपरा असून, ती जतन करण्याचे काम मुंबई मराठी पत्रकार संघ वर्षानुवर्षे करीत आला आहे, अशा शब्दांत अनेक मान्यवरांनी पत्रकार संघाला वेळोवेळी गौरविले आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZXLCG
Similar Posts
नवमहाराष्ट्राच्या जडणघडणीत शास्त्रज्ञांचे योगदान महत्त्वाचे मुंबई : ‘नव्या संकल्पना आणि नवे विचार घेऊन नवमहाराष्ट्राची जडणघडण होण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या शास्त्रज्ञांचे योगदान महत्वाचे आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी एक जानेवारी २०२० रोजी मंत्रालयात डॉ. माशेलकर यांच्याशी
‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ : देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी सादर झाला. आता राज्याचा अर्थसंकल्प सहा मार्चला सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर, अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी कोणालाही मार्गदर्शक ठरेल, असे पुस्तक माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले असून, ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ असे त्याचे नाव आहे
मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसच; अजित पवार उपमुख्यमंत्री मुंबई : कित्येक दिवस चाललेल्या चर्चांच्या फैरींनंतर एका रात्रीत महाराष्ट्राच्या राजकारणाने अचानक दिशा बदलली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. आज सकाळी (२३ नोव्हेंबर) या दोन्ही नेत्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली
‘आभार मुंबई’ : मुंबई पोलिसांकडून नागरिकांबद्दल कृतज्ञता मुंबई : समाजासाठी आपल्या कुटुंबाला दुय्यम स्थान देऊन देशसेवेचे कर्तव्य बजावणारे पोलीस, तसेच आरोग्य व स्वच्छता कर्मचाऱ्यांबद्दल देशभरातील नागरिकांनी टाळ्या, थाळ्या वाजवल्या होत्या. नंतर सैन्यदलाच्या हेलिकॉप्टर्सनी हॉस्पिटल्सवर पुष्पवृष्टीही केली होती. आता पोलिसांनीही मुंबईतील नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language